Sunday, June 5, 2011

पाउस तसा नेहमीचाच..


थेंब ही तेच, तेच ते पाणी
पावसाच्या कविता तीच तीच गाणी
सुर त्या गाण्याचा
आज जरा
वेगळा वाटला..
पाउस तसा नेहमीचाच
आज जरा एकटा वाटला.. .

पाण्यात सोडलेली राजाराणीची होडी
वाफाळलेल्या कपातील चहाची गोडी
आज त्या चहाचा गोडवा आटला
एक थेंब मात्र डोळ्यात साचला..
पाउस तसा नेहमीचाच
आज जरा एकटा वाटल.. .

10 comments:

 1. तोडलंस स्नेहे!!

  ReplyDelete
 2. अप्रतिम स्नेहा सुंदरच

  ReplyDelete
 3. स्नेहा तुझ्या शब्दांच्या या जादूमुळे

  पाउस तसा नेहमीचाच
  आज थोडा वेगळा वाटला..
  का कोण जाणे उगीचच
  जीवाला घोर लाऊन गेला.

  ReplyDelete