Sunday, June 5, 2011

पाउस तसा नेहमीचाच..


थेंब ही तेच, तेच ते पाणी
पावसाच्या कविता तीच तीच गाणी
सुर त्या गाण्याचा
आज जरा
वेगळा वाटला..
पाउस तसा नेहमीचाच
आज जरा एकटा वाटला.. .

पाण्यात सोडलेली राजाराणीची होडी
वाफाळलेल्या कपातील चहाची गोडी
आज त्या चहाचा गोडवा आटला
एक थेंब मात्र डोळ्यात साचला..
पाउस तसा नेहमीचाच
आज जरा एकटा वाटल.. .

Wednesday, May 25, 2011

मी थेंब पावसाचा..


मी थेंब पावसाचा
तुझ्याच आठवणीत रमलेला
डोळ्यातून ओघळून गालावरती हसलेला ...
मी थेंब पावसाचा
ओंजळीतून ओसरलेला

अळवावरच्या थेंबासम अस्तित्व नसलेला ...
मी थेंब पावसाचा
भेटीसाठी आसुसलेला
स्पर्शून तुझ्या मनाला पद्यात उतरलेला...

Wednesday, June 30, 2010

पाउल खुणा

पाखरे परत येतील सांज ढळून गेल्यावर,
मेघ दाटून येतील उन भाजून गेल्यावर..
सरी धाऊन येतील रान जाळून गेल्यावर,
सुखही परत येईल दुःख मारुन गेल्यावर..
होतील मागॅ मोकळे वळण टाळून गेल्यावर,
शब्द टोच्तील मनाला ते बोलून गेल्यावर..
भीजतील डोळे तुझे माझे सुकून गेल्यावर,
तू शोधशीलही खुणा राखही उडून गेल्यावर....